पुणे (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून वेगवेगळे अभियान राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते या अभियानात जोमाने सहभाग घेत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरूड मतदार संघात बूथ चलो अभियाना अंतर्गत मतदारसंघातील बूथ क्रमांक ३२० आणि ३२१ मध्ये भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी, भारतीय जनता पक्षाच्या बूथ चलो अभियानातंर्गत कोथरुड मतदारसंघातील बूथ क्रमांक ३२० आणि ३२१ मधील डहाणूकर कॉलनीतील अजिंक्य खोत आणि लक्ष्मीनगर भागातील इरफान शेख यांची भेट घेऊन मतदारांशी संवाद साधला. दरम्यान, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची यावेळी पाटील यांनी माहिती दिली.