बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे येथील कमानीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर ट्रकला काल (रविवार) रात्री उशिरा झालेल्या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला. यामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, (केए 32 डी 7277) हा ट्रक जयगडहून गुलबर्गा-कर्नाटककडे कोळसा भरून निघाला होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या गॅस टँकराला वाचवताना ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. यामध्ये चालक महेश कोळी (रा. विजापूर) तसेच क्लीनर शब्बीर गणी (रा. सोलापूर) यांना सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.