कोल्हापूर (प्रतिनिधी) : केर्ली (ता. करवीर) येथील बिअर शॉपीजवळ काही तरुणांनी दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केर्ली (ता. करवीर) येथे मोहन पाटील यांची बिअर शॉपी आहे. या ठिकाणी आलेल्या काही तरुणांनी बिअर शॉपीवर दगडफेक करत धारदार हत्याराने दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी मोहन पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणी ऋत्विक अमर सूर्यवंशी (वय २१, रा. सदर बाजार, कोल्हापूर), परशुराम बाळू बिरजे (वय २१) सुहास भगवान पवार (वय २२, दोघे राहणार कनान नगर, कोल्हापूर) या तिघांना अटक केली. त्यांचे अन्य साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.