वेब स्टोरी…
ही आहे जगातील सर्वात मोठी आणि खतरनाक नदी, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का..?

जगातील सर्वात लांब नदीच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांच्या यादीमध्ये अ‍ॅमेझॉन नदी आहे. सर्वात लांब आणि खतरनाक नदी म्हणून ॲमेझॉन नदीला ओळखले जाते.

ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ॲण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो. तर नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

ॲमेझॉन नदीची एकूण लांबी ६,४०० किमी आहे. तर ७०.५ लाख वर्ग किमी. क्षेत्रफळ व्यापलेले ॲमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.

या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर असून यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ॲमेझाॅनला “समुद्रनदी” म्हणतात.

या नदीत मासांहारी पिरान्हा मासे, ४० फूटापेक्षा जास्त लांब ॲनाकोंडा साप यासह कोट्यावधी वैशिष्ट्यपूर्ण जीवजातींची धारणा करणाऱ्या या ॲमेझाॅनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता आणि प्रति घनमीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता आहे.

या नदीच्या उपनद्या म्हणून मॉरेनोन, जॅपुरा, कॅकेटा, रिओ निग्रो, ग्वाइनिआ, पुटुमायो, उकायाली, पुरुस, मदीरा, झिंगु, आणि टोकॅंटीस या आहेत. तर ॲमेझॉन नदीच्या उपनद्यांवर सुमारे ४१२ धरणे बांधलेली आहेत.