मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पावर हे नास्तिक असल्याचे नेकदा विरोधक बोलतात. भाजप नेत्यांनीही अनेकवेळा त्यांचा नास्तिक असा उल्लेख केला आहे. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी राम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याने महिलांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नुकतीच अयोध्येतल्या मंदिरात रामनवमी साजरी झाली आणि सूर्यतिलक सोहळाही पार पडला.

दरम्यान, राम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे. तसेच तुम्ही रामाचं सगळं करता, पण तिथे सीतेची मूर्ती का नाही अशी नाराजी महिलांची असल्याचं शरद पवारांनी सांगितले. राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला, त्यावर ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, राम मंदिर होऊन गेले, आता लोक चर्चाही करत नाहीत. अजिबात चर्चा होत नाही. एका बैठकीत माझ्यासमोर हा विषय निघाला. तुम्ही रामाचं सगळं करताय, सीतेची मूर्ती का बसवली नाही अशी तक्रार महिलांनी केली. मी महाराष्ट्रात फिरतोय, मला अनुकूल चित्र दिसतंय. लोकांमध्ये सरकारविषयी नाराजी आहे. घोषणा खूप झाल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. देशाचं चित्र सध्या सांगता येणार नाही. पण लोकांशी बोलल्यावर सरकारबद्दल अजिबात आस्था नाही असं दिसतं असंही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार?
“एका मिटिंगमध्ये माझ्यापुढे विषय निघाला त्यात महिलांनी अशी तक्रार केली की रामाचं सगळं बोलत आहात मग सीतेची मूर्ती का बसवत नाही? मी महाराष्ट्रात फिरतो आहे. मला अनुकूल चित्र दिसतं आहे. राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही. तसंच या सरकारविषयी नाराजी आहे.” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल का? हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
“कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा देशात साखरेचं उत्पादनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालं. निर्यातीचा प्रश्न आहे. शेतीमालल बाहेर गेला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे अधिकचे पडले पाहिजेत या गोष्टीला या सरकारचा विरोध आहे. शेतकऱ्यांना वर्षातून एकदा सहा हजार रुपये द्यायचे, पण खतांचे दर वाढतात, औषधं महाग झाली आहेत, मजुरी महाग झाली आहे याकडे कोण बघणार?” असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.