मुंबई : सध्या लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत चांगलीच जुंपली आहे. अशातच कल्याण लोकसभा मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.शिंदे यांच्याकडून ही उमेदवारी जाहीर न होता फडणविसांनी उमेदवारी जाहीर केली. आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा रिमोट भारतीय जनता पक्षाच्या हातात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या ,कल्याण लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार असलेले श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आपुलकी आहे. पण त्यांची उमेदवारी त्यांच्या वडिलांनी म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करणे अपेक्षित होते. ती उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. याचा अर्थ शिंदेसेनेचा रिमोट हा भारतीय जनता पक्षाच्या हातात असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.