मुरगूड ( प्रतिनिधी ) मुरगूड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी नगर आणि शहराच्या पूर्व बाजूस असणाऱ्या महादेव नगर येथे बंद घरांमध्ये चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या चोरीमध्ये लाखोंचा ऐवज आणि रक्कम चोरट्याने लंपास केल्याची माहिती मिळत आहे..

मुरगूड पोलिसांकडून तपास सुरू आहे. शहरांमधील माधवनगर आणि महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या अनिकेत बाबुराव सूर्यवंशी प्रवीण पांडुरंग पाटील पारूबाई दत्तात्रय केसरकर ज्योतीराम नामदेव बोंडगे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला सर्व घरे बंद असल्याचे पाहून चोरट्याने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे…

काही महिन्यांपूर्वी मुरगूड शहरांमध्ये बंद घरे फोडून सोन्याचे दागिने आणि पैसे चोरट्याने लंपास केले होते आज पुन्हा चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बसले पुढील तपास मुरगूड शहर पोलीस करत आहेत