धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे काल (गुरुवार) रात्री चार ठिकाणी चोरी झाली. यामध्ये पान शॉप, शेती सेवा केंद्र, मोटर रिवायडींगचे दुकान आणि बीयर शॉपीत चोरी झाली. यावेळी किरकोळ रोकड वगळता चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. गेल्या सहा महिन्यात मुख्य बाजारपेठेत हा दुसऱ्यांदा प्रकार घडल्याने परीसरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचे  ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.