टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील छत्रपती राजाराम सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या निवडणूकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. यामध्ये छ. राजाराम सोसायटी परिवर्तन पॅनेलने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले असून महाविकास सहकार पॅनेलला २ जागावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी सोसायटीत परिवर्तन करायचेच या उद्देशाने परिवर्तन पॅनेलची बांधणी करून विरोधी गटाने यंत्रणा गतिमान केली होती. त्याला यश आल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. आज ५४३ पैकी ५२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे…

सर्वसाधारण गट :- परिवर्तन पॅनेल- पिलाजी पाटील, विठ्ठलपंत पाटील, विकास पाटील, मुकुंद पाटील रामचंद्र पाटील,दिलीप पाटील, शिवाजी चौगुले,अभिजित मुळीक, सदाशिव पोवार, अमोल पाटील.

महाविकास सहकार पॅनेल – भगवान पाटील, विजयसिंह घोरपडे

महिला – मयुरी पाटील, भागीरथी मुळीक परिवर्तन पॅनेल

भटक्या विमुक्त जाती- कृष्णात सिसाळ

अनु.जाती – विजय शिनगारे

इतर मागासवर्गीय गट – अखिलेश नाईक

हे सर्व परिवर्तन पॅनेलचे उमेदवार असून समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतिषबाजी करत जल्लोष केला.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक  सहकारी संस्था हातकणंगले डॉ. प्रगती बागल,  मकसुद शिंदी (सहाय्यक निवडणूक अधिकारी) तर एस. बी. नाईक (केंद्र अध्यक्ष), एस. व्ही. मसुरकर हे केंद्र अध्यक्ष म्हणुन काम पाहिले. यांना संस्थेचे सचिव शंकर पाटील आणि शाहजान सनदे यांनी त्यांना सहकार्य केले.