कोल्हापूर (प्रतिनिधी) ; छत्रपती शिवाजी महारांजाचा दिव्य असा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी स्वराज्याची राजधानी jअसलेल्या रायगडावर संपन्न झाला आणि रयतेला ‘जाणता राजा मिळाला. ३४८ वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी ट्रेकच्या माध्यमातून विविध ५ ठिकाणाहून पाणी आणण्यात आले असून ते पाणी राज्याभिषेकाकरिता वापरण्यात येणार आहे. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे हे पवित्र जल सुपूर्त करण्यात आल्याचे कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील यांनी दिली आहे.

यावेळी सागर पाटील म्हणाले की, या सोहळ्याची आठवण संपूर्ण महाराष्ट्रास राहावी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या संभाजीराजे यांच्याकडून किल्ले रायगडावर सर्व मराठी मावळ्यांच्या साक्षीने या सोहळ्याची झलक संपूर्ण देशाला पाहायला मिळत आहे. यंदाही ३४८ वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या थाटात साजरा होणार आहे. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याला शिवभक्ताला रायगडावर पोहोचता आले नाही. यंदाही हेच कोरोनाचे संकट उभे आहे.

कोल्हापूर हायकर्सच्यावतीने छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अखिल देशवासियांसाठी प्रेरणेचा आणि अभिमानाचा विषय आहे. दरवर्षी प्रमाणे ६ जूनला रायगडावर छत्रपती संभाजीराजे मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक मोठ्या थाटा माटात संपन्न होत असतो. या राज्याभिषेकसाठी ६ जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाला यंदा जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथ या महादेव मंदिरातून जल आणले आहे. हे ठिकाण १२ हजार ७३ फूट इतकं उच आहे.

त्यासाठी कोल्हापूर हायकर्सची १९ जणांची टीम दाखल झाली होती. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिरबाई (१६४६ फूट) व गंगा नदी महाराष्ट्रातून कोल्हापूरची राजधानी पन्हाळा, दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या समोर आभाळात झेप घेणारा उत्तुंग का जो साहस आणि धराराचा सुरेख संगम म्हणून ओळखला जातो असा लिगाणा. अशा या पाच पवित्र ठिकाणावरून राज्याभिषेकासाठी आम्ही हे जल आणले असल्याचे सांगितले.