टोप (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आपण सण-उत्सव साजरे करू शकतो, त्या शिवछत्रपतींना दीपावलीचा पहिला दिवा धनत्रयोदशीच्या सायंकाळी अर्पण करून टोप येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने गावातील शिवभक्त आणि वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मंदिर परिसर दिव्यांच्या उजेडाने उजळून निघाला होता. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. उपस्थितांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजात स्वाभिमान, ऐक्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचा संकल्प व्यक्त केला.