कोल्हापूर (प्रतिनिधी) : 24 डिसेंबरला सारथी, बार्टी, महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी अन्यायी सीईटी परीक्षा घेण्यात आली. ज्यावेळी सारथीने जाहिरात केली होती त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थी संख्या आणि सीईटीचा उल्लेख नाही. दोन महिन्यापूर्वी जी यादी घोषित केली आहे. त्यात सुद्धा विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र असा शेरा आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आली होती. भारतात उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 0.28 टक्केच विद्यार्थी पीएचडीला प्रवेश घेतात. आपण जर सारथी, बार्टी, महाज्योती यांना सरसकट फेलोशिप दिला नाही. परिणामी महाराष्ट्र व देशाचा संशोधन टक्का घसरेल आणि अनेक नवे संशोधक आपल्या महायुती सरकारमुळे देशाला व महाराष्ट्राला मिळणार नाहीत.

त्यामुळे २४ डिसेंबरला जी अन्यायी सीईटी परीक्षा घेतली ती इतिहासातील जिझिया सारखी होती. परीक्षा घेण्याचं आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलं. पण आपल्या अधिकाऱ्यांना साधी नवीन प्रश्नपत्रिका तयार करता आली नाही. म्हणून सेटची जुनी प्रश्नपत्रिका आहे तशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आली. अनेक परीक्षा केंद्रांवर ज्या प्रश्नपत्रिका आल्या त्या बंद न करता लिफाफामधुन सील नसलेल्या असलेल्या होत्या. अशा अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी होत्या.

यामुळे ही परीक्षा रद्द केली. यामुळे १० जानेवारीला ही सीइटी परीक्षा पुन्हा घेवून सरकार काय दिवा लावणार आहे, असा सवाल युवासेनेने केला. तर ही अन्यायी सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, अन्यथा उग्र आंदोलन करू. असे निवेदन युवासेनेच्या वतीने सारथीचे प्रभारी संचालक डॉ. विलास पाटील यांना देण्यात आले..

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, युवासेना विभाग प्रमुख, श्रीणंद वडर, प्रल्हाद वडर,ऋषभ सुरकूले आदी उपस्थित होते.