मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या वीर बालदिवस कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले जे लोक सीमाप्रश्नावर बोलत आहेत, त्यांनीच सीमावासियांच्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही सत्तेवर आल्यावर त्या पुन्हा सुरु केल्या, दोन हजार कोटींची म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना आम्ही आणली आहे. विरोधी पक्षनेत्यांची प्रकरण बाहेर काढू असे ही शिंदे म्हणाले.

सिल्लोड महोत्सवासंबंधी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप होत आहेत. त्यासंबंधीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याच्या प्रकरणांचीही आम्ही माहिती काढू आणि सत्तारांचीही माहिती घेऊ. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावरुन  मुख्यमंत्री  महाराष्ट्राकडे रवाना झाले आहेत. सीमावादावरुन सभागृहात चांगलाच वाद पेटला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा भाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी केली आहे.