पन्हाळा (प्रतिनिधी) : वेखंडवाडी ता. पन्हाळा येथील कु. विभावरी विलास खोत यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) पदी निवड झाली. पुणे प्रादेशिक विभागातील सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर अंतर्गत त्यांची नेमणूक झाली आहे. वेखंडवाडी आणि पन्हाळा येथे अनेक लोकांकडून आणि संस्थांकडून त्यांचा सत्कार होऊन निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विभावरी खोत यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड
