कुंभोज (प्रतिनिधी) : येथील कुंभोज अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेश हिंगलजे व व्हाईस चेअरमनपदी शीतल कळंत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी संस्था संचालकांच्या बैठकीचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी हातकणंगले तालुका निबंधक डॉक्टर प्रगती बागल या होत्या.

या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने संस्थेच्या चेअरमनपदी सुरेश हिंगलजे व व्हाईस चेअरमनपदी शीतल कळंत्रे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रगती बागल यांनी केली

नूतन चेअरमन सुरेश हिंगलजे यांचा सत्कार बबन पाटील यांच्या हस्ते व व्हाईस चेअरमन शीतल कळंत्रे यांचा सत्कार माजी चेअरमन रावसाहेब तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रगती बागल व मकसूद शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रोसिडिंग वाचन सचिव चाँद मुजावर यांनी केले. निवडणुकीतून माघार घेणारे भरत जमणे यांचा सत्कार चेअरमन सुरेश हिंगलजे व शीतल कळत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बबन पाटील, अण्णासो कळंत्रे, धनपाल कळंत्रे सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते.