मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सध्या देशात विधानसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहेत. विरोधक नेत्यांचे आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोपाचे सत्र सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकारला पुन्हा एकदा फैलावर घेतलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेवर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे..?

सुप्रिया सुळे यांच्या या टीकेवर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, सुप्रिया सुळे यांचे वडील राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मात्र त्या महिला असून महिलांच्या संदर्भात अशा पद्धतीच्या बोलणं हे त्यांच्या योग्य त्याला शोभा देत नाही.

सुप्रिया सुळेंनी काय केली टीका

सुप्रिया सुळें म्हणाल्या, विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहेत. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बीड मधील तणावग्रस्त परिस्थिती गृह विभागाच अपयश आहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. आता यावर महायुतीचे नेते काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.