कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूरचे सभासद आणि विद्यमान खजानीस सी. ए. अवधूत चिकोडी यांच्या पत्नी सुप्रिया राजे-चिकोडी यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल डॉक्टरेट प्रोग्रॅम अंतर्गत ‘डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली.

दिल्ली येथील लि-मेरेडिअन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना ही पदवी देण्यात आली. या लहानपणापासून ब्रह्माकुमारी विश्वविद्यालायच्या राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनमधून युवा, महिला विंगसाठी हिरीरीने सहभाग नोंदवत असत. शिवाजी विद्यापीठातून एम. कॉम., एम. फिल., एम.बी.ए. झालेल्या सुप्रिया या सखे गं सये, मुक्ताई प्रतिष्ठान, एनरीच या संस्थांतून त्या अविरत कार्यरत असतात. रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूरशी त्या संलग्न आहेत. इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या त्या विद्यमान एडिटर आहेत.