वारणानगर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेची केंद्रस्तरावरून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मनपाडळेच्या विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये घवघवीत यश मिळवण्याबरोबरच सर्वसाधारण विजेतेपदाचा किताबही पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दिलीप बच्चे, अध्यापक प्रकाश बेलवलकर, उत्तम पोवाळकर, माणिक पेठकर, मोहन कांबळे, अध्यापिका सुनीता कुंभार, व्रृशाली मांडरे, व अर्चना काशीद यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील नागरिकांचे सहकार्य लाभले.