कोल्हापूर (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, राष्ट्रीय आत्मीयता आणि
बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय/राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून प्र-कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते.

राष्ट्रीय सेवा योजन क्षेत्रीय कार्यालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय केंद्र सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ.प्रशांतकुमार वनंजे, भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन प्रमुख उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, उत्कृष्ट नमुना होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध
कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. यामधून आपल्या कलागुणांना वाव मिळतो आणि आपल्यामधील नेतृत्वगुण
उजागर होतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारे आहे.

भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन म्हणाले, शिवाजी
विद्यापीठामधील राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग विविध कार्यक्रमांचे यशस्वीरीत्या आयोजन करून खूप चांगले योगदान
देत आहे. या शिबिरांमध्ये शिकवली जाणारी शिस्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे. छोटया-छोटया प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी हिरहिरीने भाग घेतला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. प्रशांतकुमार वनंजे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास असे शिबिर सहाय्यभूत ठरतात.

प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचेसह संघ व्यवस्थापक डॉ. निर्मला जाधव, डॉ. पवन शिनगारे, डॉ. गांधी पुष्कर,
डॉ. कल्याण सावंत, स्वयंसेवक कु.सृष्टी क्षीरसागर, सार्थक पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, युवा अधिकारी अजय शिंदे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, महाराष्ट्र शासनाचे मंगेश खैरनार, रमेश देवकर, कॅप्टन प्रशांत पाटील, कॅ. राहुल मगदूम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.अभय जायभाये डॉ. स्नेहल राजहंस, डॉ. संदीप पाटील युवा अधिकारी अजय शिंदे आणि जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील कार्यक्रमास राज्यभरातील २९ विद्यापीठांचे २८० रासेयोचे स्वयंसेवक, अधिकारी व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.