कोल्हापूर (प्रतिनिधी) : ५ ऑक्टोबरला काही समाजकंटकांनी गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथ शिखर येथील गोरक्षनाथ मंदिरातील ५० किलो वजनाची मूर्तीची तोडफोड केली. तसेच पूजेचे साहित्य विस्कटून टाकले. याच समवेत मूर्ती उंचावरून खाली टाकून दिली. यापूर्वीही समाजकंटकांनी अनेकवेळा तिथे अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आह. तरी अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी.या मागणीसाठी दत्तभक्तांनी मिरजकर तिकटी ते लक्ष्मीपुरी येथील दत्तमंदिरापर्यंत मूकफेरी काढली. या फेरीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

मंगेश लेले म्हणाले, गुजरात राज्यातील जुनागढ येथील गिरनार पर्वतावर हिमालयापेक्षा प्राचीन अशा ठिकाणी दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे. या पवित्र स्थानावर अनंत काळापासून श्री दत्त महाराज तपस्या करत होते. तरी अशा ठिकाणी करण्यात आलेली तोडफोड हे नियाजनद्ध कृती असून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, मंदिरांची तोडफोड करणे अशी आहे. यासाठी कडक कायदा झाला पाहिजे. आणि या संदर्भात आम्ही उद्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.