कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी विविध क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमठवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी आज कोल्हापूर येथे निधन झाले. त्यामुळे कामगार चळवळ ते समाजकारण असा प्रवास त्यांचा प्रवास आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, समीक्षा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजा शिरगुप्पे हे निपाणी येथील कामगार चळवळीतून ते समाजकारणात सक्रिय झाले होते. लेखणी ही समाज व्यवस्था बदलासाठी असते या विचाराने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. बिहार च्या राजकारणावर त्यांचा दांडगा अभ्यास होता. ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील अशा नानाविध चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.

सांगली येथे 2010 साली झालेल्या 10 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मात्र आज त्यांच्या जाण्याने अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांनी मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं म्हटलं आहे.