कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी छत्रपती ताराराणी सभागृहातून स्थायी समिती सदस्य, सदस्या यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

या सभेत कोल्हापूर शहरात नाले जोड प्रकल्प कनेक्शनबाबतच्या तक्रारी, खेलो इंडियामध्ये प्रस्तावित केलेले काम, बंद पडलेले रेऑन कंपनीचे बल्ब, विकास आराखडा, एलबीटी थकबाकी वसुली, शहरातील घरफाळा सर्व्हे, स्टर्लिग टॉवर रस्त्याबाबत चर्चा करण्यात आली.