कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस्‌ बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षि शाहू (सत्तारूढ) पॅनेलचा पणोरी, धामोड, कळे येथे मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात राजर्षि शाहू (सत्तारूढ) पॅनेलचे सर्व पंधरा उमेदवारांसहीत सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते. या मेळाव्याला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पणोरी येथे प्रचार फेरीवेळी शामराव चव्हाण (महाराज), पी. डी. पाटील (बुजवडे),  मधुकर निचिते, प्रकाश पाटील (राधानगरी), सुनिल वर्णे आदी मान्यवर होते. तर धामोडच्या प्रचार फेरीमध्ये विजय आंबोळे (शाखा अभियंता), एम.के.पाटील, डी.बी.सारणे, प्रकाश पाटील, पांडुरंग मगदूम, बाजीराव लिंगडे आदी मान्यवर सोबत होते.

तसेच कळे येथील प्रचार फेरीमध्ये संजय पाटील, अभिजित कातवरे यांनी पॅनेलच्या सर्व उमेदवारांसहित भागात प्रचार दौरा केला. या दौऱ्यामध्ये सर्व संघटनांनी आपला शंभर टक्के जाहीर पाठिंबा दिला.