कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा-गगनबावडा तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने चित्रकला ग्रेड विषयाची कार्यशाळा विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय, कळे येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत एकूण ५५ शाळांमधील शिक्षकांनी भाग घेतला होता.

कार्यशाळेचे उद्घाटन पन्हाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. एम. मानकर, तालुका संघाचे अध्यक्ष एस. आर. पाटील, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, संचालक श्रीकांत पाटील, तालुका संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, तालुका संघाचे सचिव एच. वाय. शिंदे व मुख्याध्यापिका डॉ. प्रमिला भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यशाळेस के. एस. कुंभार (न्यू इंग्लिश स्कूल यवलूज), एस. टी. पाटील (कोडोली हायस्कूल),  आर. एम. भोसले (पन्हाळा विद्यामंदिर) व  एस. आर. कुंभार (विठ्ठल पाटील विद्यालय, कळे) यांनी मार्गदर्शन केले. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव एच.वाय. शिंदे यांनी आभार मानले.