कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य आणि ज्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असतील, अशा पाल्यांना एकरकमी १० हजार रुपये व २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

माजी सैनिक/पत्नी/पल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज १० नोव्हेंबर २०२० पर्यंत करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर वि. बा. पाटील (नि) यांनी केली आहे.