कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ‘एकजूट’ सर्वांगीण शालेय विकासासाठी या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून शाळांचा विकास आणि मुलांची गुणवत्ता वाढविणे बाबतचे धोरण शैक्षणिक ग्रामसभेच्या माध्य‌मातून निश्चित करून नक्कीच प्रगती साधता येईल या उद्देश्याने विशेष शैक्षणिक नियोजन मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

शैक्षणिक ग्रामसभेत शाळेच्या भौतिक गरजा,विद्यार्थी सुरक्षा व गुणवत्ता या विषयांवर चर्चा करण्यात आली.शाळा विकास आराखडा तयार करून तो ग्रामपंचायत आराखड्यात समाविष्ट होईल.यासाठी चर्चा करण्यात आली. दत्तवाड़ातील जिल्हा परिषदेच्या चारही शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळांच्या भौतिक गरजा मांडल्या. त्यावर विचारमंथन होवून निरसन करण्याचे ठरले.सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुमार सिदनाळे यांनी चार ही शाळांना प्रत्येकी ५ पुस्तके तर पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी १० पुस्तके देण्याचे जाहीर केले.

या शैक्षणिक ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत सदस्य अकबर काले,मनिषा चौगुले, डी.एन.सिदनाळे,अशोक पाटील,कुमार सिदनाळे, मुख्याध्यापक,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,मिलिंद देशपांडे,इसाक नदाफ, शहानवाझ अपराध,दिलीप शिरढोणे, पालक,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी उपस्थित होते.