सांगली/प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे तीन दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली लोकसभेच्या जागेवर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर कॉंग्रेसनेही या जागेवर दावा सांगत सांगली लोकसभा कोणत्याही परिस्थितीत लढणार असा निर्धार केला आहे. त्यामुळे नाराज कॉंग्रेस नेत्यांची समजूत राऊत काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर सांगली लोकसभेची जागा ही शिवसेनाच लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पुढे बोलताना संजय रूट म्हणाले, सांगली लोकसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवण्यावर ठाम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा करु नये असं राऊतांनी म्हटलंय. तसेच चंद्रहार पाटलांचाच विजय होणार, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले. विशाल पाटील यांच्या संदर्भात आस्था आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेणार आहे. सांगलीच्या बाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार आहे. मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे . प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा मनोमन असते. तसेच रामटेक हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे. पण कॉंग्रेसने तेथे उमेदवार तेथे उमेदवार जाहीर केला. आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की तो मतदारसंघ आमच्याकडे असावा. पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदार संघ काँग्रेसला दिला. तसेच छत्रपती शाहू महाराजांचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता पण आम्ही त्याची समजूत काढली.

चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित : संजय राऊत
संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीचे लोक प्रचाराला लागलेलो आहे . आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे . वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं . महाविकास आघाडीचे वातावरण हे झंजावात असावा त्या पद्धतीचा दिसत आहे . कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही . सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत . मिरजेमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रचंड सभा झाली. आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत. आज उद्या परवा मी देखील त्या भागात जाणार आहे. चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला मी आलो आहे. तसेच सांगलीतील वातावरण पाहता चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.