मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यात भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली. तसेच अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी महाराजांना धर्मवीर बोलले तरी चुकीचे नाही असे शरद पवार म्हणाले आहेत. ठाण्यात काही नेत्यांची नावे धर्मरक्षक अशी दिसून येतात. धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय? ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावे. राज्याचे रक्षण करण्याचे त्यांनी महत्त्वाचे काम केले त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचे नाही. त्याच्यावरून वाद करण्याची गरज नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको असेही शरद पवार म्हणाले.

.