जोतिबा (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच आज (शुक्रवार) सकाळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. ही पूजा पुजारी प्रकाश सांगळे, दादा भंडारी, आदिनाथ लाडे, प्रवीण कापरे यांनी साकारली.