पुणे ( प्रतिनिधी ) निर्भय बनो कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत निखील वागळे यांनी निर्भय बनो यात्रेचं आयोजन केले आहे. दरम्यान आज त्यांच्या कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी निखील वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना वागळेंची गाडी फोडण्यात आली आहे. तसेच गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. या कार्यक्रमात भाषण करणाऱ्या पत्रकार निखील वागळेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा कार्यक्रम उधळून लावणार असं पुणे शहर भाजपने जाहीर केल होतं.

तसेच भाजपने या कार्यक्रमास विरोध केल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. निखील वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना भाजपकडून निखील वागळेंची गाडी फोडण्यात आली. तसेच गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली असल्याची ही माहिती समोर आली आहे.