पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील कॉम्प्युटर सायन्स विभागाचा विद्यार्थी असजद अमीर पठाण याची ‘इंटेग्रा’ या नामांकित कंपनीत निवड झाली असून, कंपनीतर्फे त्याला वार्षिक ९ लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. त्याच्या या यशाबद्दल संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी.  आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांच्या हस्ते सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील असजद पठाण हा विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्याचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. संजीवन शिक्षण समूहाची स्थापना ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा शिकला पाहिजे, यासाठीच झाली आहे. विद्यार्थी हीच संपती आणि पालक हेच दैवत मानून ‘संजीवन’ची वाटचाल चालू असल्याचे पी. आर. भोसले यांनी यावेळी सांगितले.

असजद पठाण याच्या सत्कारप्रसंगी त्याचे वडील अमीर पठाण व आई सायरा पठाण उपस्थित होते. त्याच्या या निवडीसाठी संगणक विभागप्रमुख प्रा. राहुल नेजकर, टी.पी.ओ. डॉ. अजय मस्के, प्रा. प्रवीण अतिग्रे, प्रा. तेजश्री देवकर, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन कोळी, उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.