चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी शिरोलीकर यांना आज (रविवार) अजिंक्यतारा कार्यालयात दिले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व आजरा-गडहिंग्लज -चदगंड समन्वयक विद्याधर गुरबे, विक्रम सुरेशराव चव्हाण-पाटील, महादेव वांद्रे, जयसिंग पाटील, चंदगड नगरपंचायत नगरसेवक अभिजीत गुरबे, बाळासाहेब हळदणकर, अशोक दाणी, कलीम मदार, प्रसाद वाडकर, उदय देसाई, जयवंत शिंदे, कार्यकर्ते उपस्थित होते.