कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचं वारं सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील सर्वच पक्ष, आघाडींमध्ये निवडणूकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे.

यावरचं “कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ -२०२६ या कालावधीमध्ये होणारी निवडणूक एस. फोर.ए. विकास आघाडीच्या मार्फत सर्वच प्रभागात उमेदवार उभे करणार आहोत. मागील महानगरपालिका निवडणूक आम्ही एस. फोर.ए. विकास आघाडी पक्षातर्फे लढविली होती. दुस-यांदा ही निवडणूक लढविणारअसून या बाबत लवकरच प्रेस घेवुन अधिक माहिती देणार आहोत” असं एस. फोर.ए. विकास आघाडीचे अध्यक्ष राजू उर्फ सुनील माने यांनी सांगितले.