मुरगूड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात भात कापणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनुसार मजुरांच्या सहाय्याने भात कापणी आणि मळणीला प्रारंभ केला आहे. यंदा बहुतांश शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय स्विकारताना दिसत आहेत. मात्र परतीच्या पावसाने भात कापणी आणि मळणीला व्यत्यय येत आहे.

एकरातील भात सहज कापले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे मजुरीचा खर्च कमी झाला असून उत्पादन अधिक दर्जेदार पद्धतीने साठवणे शक्य होत आहे. सध्या माळरानातील भात कापणी सुरू असून शेतकऱ्यांची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांची भातपिके मागास आहेत यामुळे दिवाळीनंतर मात्र कापणी मशिनमुळे मळणीचा जोर वाढणार आहे.