मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर आणखी एका खेळाडूने टी-२० क्रिकेटला अलविदा केला आहे. दरम्यान, विराट कोहिली नंतर भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला. यानंतर आता अष्टपैलू रवींद्र जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला आहे. मात्र, रवींद्र जडेजा वनडे आणि कसोटीत खेळत राहणार आहे.

दरम्यान, शनिवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. यासोबतच आता या यादीत रवींद्र जडेजाचेही नाव जोडले गेले आहे. अशा प्रकारे टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर तीन महान भारतीय क्रिकेटपटूंनी या फॉरमॅटला अलविदा केला आहे.

जडेजाने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती दिली. निवृत्ती घेतल्यानंतर जडेजाने लिहिले, “पूर्ण अंतःकरणाने कृतज्ञतेने मी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना अलविदा म्हणतो. अभिमानाने सरपटणाऱ्या अविचल घोड्याप्रमाणे, मी नेहमीच माझ्या देशासाठी आणि इतर फॉरमॅटसाठी माझे सर्वोत्तम दिले आहे. यापुढेही असेच करत राहीन. हे माझ्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान आहे. आठवणी, उत्साह आणि अटूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद. यासोबतच जडेजाने इतर फॉरमॅटवरही मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला- मी वनडे आणि कसोटी खेळत राहीन. दरम्यान रवींद्र जडेजा टी-20 विश्वचषक विजेता झाल्यानंतर भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यांना जल्लोष करण्यासाठी त्यांच्या भाजप आमदार पत्नी रिवाबा जडेजाही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.