वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शिवाजी हाऊसच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर शाहू हाऊसच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच अभिनय स्पर्धेत सैनिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच शाहू महाराजांनी केलेल्या विविध कार्याचा आढावा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अकॅडमीचे प्राचार्य टी. बी. रहाटवळ, प्राचार्य डॉ. एम. टी. कलाधरण, कार्यक्रम विभाग प्रमुख शेखराज नदाफ आदी उपस्थित होते.