शिरोळ (प्रतिनिधी ) : शिरोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झाली असून प्रसिद्ध झालेल्या प्रारूप (कच्ची) मतदार यादीमधील प्रचंड प्रमाणात चुका आढळून आल्या आहेत तसेच इतर प्रभागात नावे लागण्या संदर्भात पृथ्वीराजसिंह यादव यांनी निवडणूक मतदान अधिकारी यांची भेट घेतली.
प्रभागाच्या सिमेतील मतदारांची नावे दूसऱ्या प्रभागात असणे, एका कुटूंबातील नावे वेगवेगळ्या प्रभागत दर्शवणे अश्या अनेक त्रुटीं आढळून आल्या आहेत याबाबत चर्चा करुण त्रुटी दुरुस्त करणे बाबत निवेदन दिले. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या व वसुली कर्मचाऱ्यांचा मदतीने या त्रुटींची पडताळणी व निरीक्षण करूण मतदान यादीतील घोळ दुरुस्त करण्या संदर्भात त्यांना सुचना देण्यात आल्या.
ज्या मतदारांची नावे इतर प्रभागात गेली आहेत त्यांनी हरकत फॉर्म भरून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हरकत फॉर्मसह जोडून नगरपरिषद येथे जमा करण्याचे आवाहन निवडणुक मतदान अधिकारी यांनी केले.