कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी प्रभाकर निर्मळे हे आज (बुधवार) रूजू झाले. यापुर्वी ते अधीक्षक अभियंता या पदावर प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत होते. प्रभाकर निर्मळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील घोसरवाड गावचे  मुळ रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. ते १९८४ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ट अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. त्यांनी तब्बल ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत कनिष्ट अभिंयता ते अधीक्षक अभियंता या पदावर वसई, कल्याण, महाड, मुलुंड, वाशी, कळवा, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, सातारा या ठिकाणी सेवा बजाविली आहे.