कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पूर्व वैमनस्यातून गांधी मैदान ते खरी कॉर्नर रोडवर 5 जून रोजी सात तरुणांनी एकाचा पाठलाग करून खुनी हल्ला केला. शिवाजी पेठेतील हर्षवर्धन उमेश मोरे हा यामध्ये जखमी झाला होता. ही घटना गुरूवारी (दि. ५) घडली होती. याच प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांची जुना राजवाडा पोलिसांनी आज धिंड काढली.

विशेष म्हणजे जीव वाचवण्यासाठी मोरे याने एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. त्यानंतर मोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार ओम आवळे, मनोज उबाळे, यश माने, ऋतिक साठे, वैभव कुरणे, राज झगडे यांच्यासह एक अनोळखी व्यक्ती विरोधात जुना गुन्हा दाखल केला होता.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी यातील तिघांना त्यांच्या घराच्या परिसरात फिरवून सिंघम स्टाईल चांगलाच माज उतरवला. विशेष म्हणजे परिसरात अशा पद्धतीने जर मुले बिघडत असतील. तर त्यांना तात्काळ समज द्या ! एक बिघडला तर दुसरा बिघडत जातो आणि पुढे मोठ मोठ्या गुन्ह्यात ते जातात. एखाद्या वेळेस यांचा खून सुद्धा यामधून होतो, असे सांगत तरुणांना कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसमोर चांगलीच समज दिली.