पन्हाळा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्षर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोर्ले तर्फ ठाणे येथे पन्हाळा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर, सभासद नोंदणी उपक्रमाचे आयोजन केले होते.  या शिबिराला राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी मार्गदर्शन केले.     

यावेळी शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी, पन्हाळा तालुक्यात कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. तर बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी शरद पवार यांनी लोकांसाठी केलेली कामे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जि. प. सदस्य प्रियांका पाटील, पोर्ले तर्फ ठाणेच्या सरपंच गीता चौगले, बळवंत पाटील, अंगद शेवाळे, इंद्रायणी चौगले, राधीका शेलार, राधा बुणे, उज्वला चौगले,  दाजी पाटील,  भिमराव पाटील, सरदार पाटील, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.