कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात तसेच पं.स. सभागृहात गुरुवारी पंचायत समितीच्या गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले. हे आरक्षण जाहीर झाल्याने काही ठिकाणी इच्छुकांमध्ये ‘कभी ख़ुशी, कभी गम’चा प्रत्यय आला. दि. २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत आरक्षणबाबत हरकती व सूचना सादर करावयाच्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्याने आता ग्रामीण स्तरावर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

कागल तालुका : कसबा सांगाव- सर्वसाधारण, मौजे सांगाव- अनुसूचित जाती, सिद्धनेर्ली- अनुसूचित जाती स्त्री, म्हाकवे- सर्वसाधारण, सावर्डे बु.- सर्वसाधारण, बोरवडे- सर्वसाधारण स्त्री, मळगे बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, बानगे- सर्वसाधारण स्त्री, कसबा चिखली- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, हमीदवाडा- सर्वसाधारण स्त्री, कापशी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, माद्याळ- सर्वसाधारण.

भुदरगड पं.स. : आकुर्डे- सर्वसाधारण महिला, कूर- सर्वसाधारण महिला, गारगोटी- ओबीसी महिला, मडिलगे– सर्वसाधारण, पिंपळगाव- सर्वसाधारण, कडगाव- मागासवर्गीय अनुसूचित पुरुष, पुष्पनगर- ओबीसी पुरुष, मठगाव- सर्वसाधारण महिला.

पन्हाळा पं. स. : सातवे- सर्वसाधारण, माले- सर्वसाधारण, कोडोली (पश्चिम)- सर्वसाधारण स्त्री, कोडोली (पूर्व)- अनुसुचित जाती स्त्री, वाडी रत्नागिरी- अनुसूचित जाती, बोरीवडे- सर्वसाधारण, पोर्ले तर्फे ठाणे- नागरिकांचा मागास वर्ग स्त्री, यवलूज – नागरिकांचा मागास वर्ग, वाघवे- नागरिकांचा मागास वर्ग स्त्री, कोतोली- सर्वसाधारण स्त्री, पुनाळ- सर्वसाधारण स्त्री, बाजार भोगाव- सर्वसाधारण, कळे- सर्वसाधारण स्त्री, वेतवडे- सर्वसाधारण.

गगनबावडा पं. स. : तिसंगी- अनुसूचित जाती सर्वसाधारण, असंडोली- सर्वसाधारण, असळज- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, धुंदवडे- सर्वसाधारण स्त्री.