पंढरपूर, प्रतिनीधी

पंढरपूर शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी मंगळवार दि 27 डिसेंबर रोजी वेध भविष्याचा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.
सदरचे मंथन शिबिर हे मंगळवारी सकाळी 10 वाजता कर्मवीर कॉलेज रोड मार्केट यार्ड समोरील धनश्री हॉटेल येथे होणार आहे. 

या शिबिरासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, जिल्हयाचे कर्याध्यक्ष  उमेश पाटील, हे प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेश अध्यक्ष नगेशदादा फाटे, जिल्हा उपाध्यक्ष युवराजदादा पाटील, किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस मारुती जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ऍड गणेश पाटील, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हे शिबिर पार पाडण्यासाठी तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, शहराध्यक्ष सुधीर भोसले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदिपदादा मांडवे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ राजश्री ताड, महिला शहराध्यक्ष सौ संगीता माने, यासह पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादीचे विविध विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तरी सर्व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी दिली.