कोल्हापूर (प्रतिनिधी) : रागाने माहेरी गेलेल्या बायकोला घरी परत बोलवण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नीसह सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली आहे. शंकर शामराव भास्कर (वय ५३, रा. जवाहनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीसह चारजणांविरुधात  राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शंकर भास्कर जवाहनगर हे जवाहर नगर येथे राहतात. त्यांची पत्नी मालन यांच्याबरोबर वाद झाला. या रागातून पत्नी राजेंद्रनगर येथे माहेरी राहण्यास गेली. शंकर भास्कर हे बायकोला घरी परत बोलवण्यासाठी गेले असता सासरच्या लोकांबरोबर पुन्हा वाद झाला. यावेळी नागेश शिंदेनी एडका हत्याराने तर दशरथ शिंदेनी तलवार आणि पत्नी मालन यांनी शंकर भास्कर यांच्या डोक्यात फरशी घालून मारहाण केली. सासू निलाबाई शिंदे व संपदा काळे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद शंकर भास्कर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी मालन भास्कर, नागेश शिंदे, दशरथ शिंदे, निलाबाई शिंदे आणि संपदा काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.