कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर भाजपच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९७ वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेत सुशासन दिन साजरा करत अभिवादन करण्यात आले.  बिंदू चौक येथे लक्ष्मीपुरी मंडलाच्यावतीने प्रतिमा पूजन करण्यात आले.

पक्षाच्यावतीने शहरातील ७ मंडलात प्रमुख चौकामध्ये तर शक्ती केंद्र, बूथ स्तरावर जवळपास ११० ठिकाणी अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सर्वच ठिकाणी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत, त्यांच्या कवितांचे वाचन, त्यांची प्रेरणादायी भाषणे याविषयी उपस्थितांना अटलजींचा परिचय करून देण्यात आला.

भाऊसाहेब गणपुले, विष्णू सागंलीकर, सुभाष वोरा, बाबुराव जाबशेट्टी, कर्नल शंकरराव निकम, तात्यासाहेब तेंडूलकर अशा जनसंघ ते भाजपा असा प्रवास करणाऱ्या सध्या हयात असणारे जेष्ठ पदाधिकारी यांना भेटून तसेच स्वर्गीय पदाधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून त्यांचा सन्मान भाजपा पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आला.

शहरात विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमावेळी प्र.का.सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, भरत काळे, डॉ.राजवर्धन, सुधीर देसाई, रविंद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, सचिन सुतार, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.