मुंबई : काल संसदेत खाजदारांनी शपथ घेतल्यांनंतर लोकसभा विरोधी पक्ष नेते म्ह्णून काँग्रेस नेते राहुल गांधींची निवड करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान हाथी घेऊन शपथविधी पूर्ण केली. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावा लागणार आहे, ते संसदेतून पळ काठू शकत नाहीत असा टोला त्यानी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले , लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही सरकारनं आमच्यावर लादली आहे . तुम्ही उपाध्यक्षपद जर विरोधकांना दिले तर निवडणुकांचा आम्ही फेरविचार करु अशी इंडिया आघाडीची भूमिका होती. पण सुंभ जळला तरी पिळ कायम आहे, तो पिळही उतरेल असं म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. परंपरेनं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. विरोधी पक्ष हा मोठा आहे. विरोधी पक्षाचा आकडा हा 240 चा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधींना राम राम करुनच मोदींना सभागृहात बसावं लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार असेही राऊत म्हणाले. गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली आहे. पण आता ते शक्य होमार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. इतका मोठा विरोधी पक्ष आहे. आता तर राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून समोर बसले आहेत. त्यामुळं राहुल गांधींना राम राम करुनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागले असेही राऊत म्हणाले. त्यामुळं आता संसदेच अधिवेशन सुरु असताना मोदींना पळ काढता येणार नाही, कारण समोर आता राहुल गांधी बसलेत असंही राऊत म्हणाले.

राहुलगांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्याबद्दल त्यांचं आभार – संजय राऊत

राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं ही देशाच्या दृष्टीनं शुभसंकेत आहेत. त्याबद्दल आम्ही राहुल गांधी यांचे आभार मानत असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार होती. विधानसभेच्या दृष्टीनं प्राथमिक चर्चेला आज सुरुवातही करणार होतो. पण आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. यामुळं काही नेते दिल्लीत आले आहेत. त्यामुळं आज होणारी मुंबईतील बैठक रद्द होणार आहे. लवकरच मुंबईत महाविकास आघाडीचीबैठक होईल असे राऊत म्हणाले.