कागल  (प्रतिनिधी) :  ज्येष्ठ संचालक माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कामकाजाची प्रशंसा करताना ते सी. ए असल्यामुळे त्यांना कारखान्यांचा ताळेबंद चांगल्या पद्धतीने समजतो. याचाच संदर्भ देत घाटगे यांनी मला कारखान्याचा ताळेबंद तर कळतोच. परंतु आता या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय ताळेबंद कसा जमवायचा हेही कळाले आहे. अशी मिश्किल टिप्पणी  समरजितसिंह घाटगे यांनी केली.

येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन २०२१ ते २०२६ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांच्या  अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली. नूतन संचालक मंडळामध्ये ७ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

यावेळी काकडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. राजे समरजितसिंह घाटगे,  सुहासिनीदेवी घाटगे, अमरसिंह घोरपडे,  माजी आमदार वीरकुमार पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळ सदस्य नावे गटनिहाय अशी आहेत .

अ वर्ग उत्पादक सभासद गट-

श्रीमंत समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे,

श्रीमंत श्रीमती सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे,

अमरसिंह गोपाळराव घोरपडे, वीरकुमार आप्पासो पाटील, धनंजय सदाशिव पाटील,

सचिन सदाशिव मगदूम, संजय रामचंद्र नरके,

यशवंत जयवंत माने, शिवाजीराव शंकर पाटील,

सतिश रायगोंडा पाटील, प्रा.सुनिल सदाशिव मगदूम

 उत्पादक सभासद  गट (महिला)

रेखाताई प्रताप पाटील,  सुजाता रंगराव तोरस्कर

अनुसुचित जाती/जमाती गट-

भाऊसो शिवराम कांबळे

ब वर्ग बिगर उत्पादक सभासद सहकारी संस्थां गट-

युवराज अर्जुनराव पाटील

यावेळी ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. अमरसिंह घोरपडे युवराज पाटील यांनी  आभार मानले.