पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी सपत्नीक ‘निसर्गछाया’ या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाचा गोडवा अनुभवाला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना म्हटले आहे कि, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शहरी झगमगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात नयनरम्य ठिकाणी काही काळ व्यतीत करावा असं प्रत्येक ज्येष्ठ पुणेकर नागरिकांना वाटत असतं. परंतु हाताशी असलेल्या शिदोरीमुळे प्रत्येकालाच उतारवयात हा सुखद अनुभव घेता येतो असं नाही.

या पार्श्वभूमीवर निसर्गाचं हे विहंगम रुप प्रत्येकाला अनुभवता यावं यासाठी लोकसहभागातून पुण्यातील चांदणी चौकापासून चार किमी अंतरावर भूगावमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निसर्गछाया’ हा उपक्रम सुरू होत आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील ज्येष्ठांना निसर्गाचा गोडवा अनुभवता येणार आहे. चंद्रकांत पाटील यांना देखील या निसर्गछायेचा मोह न आवरल्याने आज मी सपत्नीक येथे वास्तव्यास असून येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला.