कणकवली (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ ते १७ जानेवारी २०२६ मध्ये आयोजित केले आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्रासह देश-विदेशातील ३०० हून अधिक इतिहासाचे अभ्यासक व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. अधिवेशनात कोकण व भारतातील इतिहासावर विचारमंथन होणार आहे, कोकणातील कला, साहित्य, संस्कृती व इतिहासाचा आतंरराष्ट्रीय पातळीवर लौकिक वाढविण्यासाठी हे अधिवेशन घेतले जात आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे यांनी दिली. त्या कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मोरे बोलत होत्या.

श्रीमती मोरे म्हणाल्या, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना १९१९ मध्ये झाले. परिषदेने आत्तापर्यंत ३२ अधिवेशन घेतली आहेत. कोकणातील पहिले अधिवेशन १६ व १७ जानेवारी २०२६ मध्ये कणकवली महाविद्यालयात होणार आहे. १६ रोजी अधिवेशनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर दोन दिवसात प्राचीन, मध्ययुगीन, आधुुनिक अशा तीन सत्रात शोधनिबंध सादर केले जाणार आहे. इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणाºया पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेला ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, अभ्यासक डॉ. अशोक राणा, डॉ. जी.डी. खानदेश यांच्यासह अन्य काही जणांना इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल भारतीय स्तरावरील ग्रंथ प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, ऐतिहासिक चित्र प्रदर्शन, छायाचित्रे प्रदर्शन, मोडी लिपी प्रदर्शन, युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळवलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह््यातील विजयदुर्ग व मालवण या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शनासह जिल्हास्तरावर विविध स्पर्र्धाचे आयोजन केले जाणार आहे.
सुंदर समुद्र किनारे, हिरवागार निसर्ग, प्राचीन मंदिरे, कातळ शिल्पे, मराठा कालीन ३६ किल्ले, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पर्यटन स्थळे, मत्स्य आहार, कला, लोककला, शिल्पकला हे जिल्ह््याचे भूषण आहे. या अधिवेशनाला येणाºया अभ्यासक व प्रतिनिधींना भौगोलिक, अध्यामिक, ऐतिहासिक पर्यटन, संशोधनाची नवी पर्वणी मिळणार आहे. कणकवली महाविद्यालयात होणारे हे अधिवेशन हे इतिहास विषयाबरोबरच आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालणार देणार ठरणार आहे, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. सोपान जावळे, युवराज महालिंगे, विजय वळंजू, सोमनाथ कदम यांनी हे अधिवेशन घेण्यामागील उद्देश व हेतू सांगितला.

यावेळी परिषदेचे सचिव डॉ. सोपान जावळे, सदस्य डॉ. नारायण गवळी, डॉ. शोभा वाईकर, शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव विजय वळंजू, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. राजेंद्र मुंबरकर, सोमनाथ कदम, श्यामराव डिसले, संजय ठाकूर, बोलके, सातवसे, राठोड आदी उपस्थित होते.