कोल्हापूर/प्रतिनधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल आहे. तर महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. दरम्यान, भाजपने लोकसभेची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० नेत्यांच्य नावाचा समावेश आहे. पण कोल्हापूरच्या दोन जागांवर कोण उमेदवार असणार याचा सस्पेन मात्र वाढला आहे. राज्यातील ज्या काही जागांवरून आणि उमेदवारावरून महायुतीत वाद सुरू आहे त्यापैकी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. भाजपच्या सर्वेत दोन्ही उमेदवारांवर लोकांची नाराजी असल्याने भाजपकडून उमेदवार बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. पण मुख्यमंत्री शिंदे हे विद्यमान खासदारांना संधी मिळावी यासाठी आग्रही आहेत. पण सध्या तरी कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे.

भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांची नवे नाहीत. त्यामुळे या मतदारसंघातून आता महायुतीकडून सरप्राईज उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोल्हापूर मधून भाजपचे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना तर हातकणंगलेमधून शिरोळमधील अपक्ष आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. हातकणंगल्यातील जातीय समीकरण लक्षात घेत संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर चर्चा झाली असून भाजप त्यांना निवडणुकीचा रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे.

चर्चा कोणाची पण असो उमेदवार मीच : मंडलिक
कोल्हापूर लोकसभेचा दोन्ही जागांवर उमेदवार बदलण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना चर्चा कोणाच्याही नावाची असो, पण उमेदवार मीच असणार असे म्हणत संजय मांडलिक यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.  

कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे त्या दोन्ही जागांवर शिंदे गटाने दावा सांगितला आहे. पण लोकांची नाराजी लक्षात घेता भाजपकडून उमेदवार बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. पण सध्यातरी खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने हेच उमेदवार असतील अशी माहिती सुत्रंनी दिली आहे.

हातकणंगलेसाठी संजय पाटलांच्या नावाची चर्चा
हातकणंगले लोकसभेसाठी संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय पाटील यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याने आयत्या वेळी नव्या नावांवर चर्चा करण्यात आल्याची चर्चा आहे. 

हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात नाराजी असल्याचं भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर एकनाथ शिंदे मात्र मानेंनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यातच आता भाजपने हातकणंगले मतदारसंघावर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच भाजपकडून त्यांचे समर्थक आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचं नाव पुढे आणण्यात आलं आहे. मात्र कोरे यांनी लोकसभेची जागा मागितली नसल्याचे म्हणत उमेदवारीवर पडदा टाकला आहे.

या सगळ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे गट मात्र ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यामुळेच आता धैर्यशील माने यांच्या नावाला असलेला विरोध लक्षात घेता नवीन नावावर चर्चा केली जात आहे. 

अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. हातकणंगल्यातील जातीय समीकरणं लक्षात घेता त्यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळेच त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकरांचं नाव आता पुढे येत आहे.