पुणे ( वृत्तसंस्था ) अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने देशभरातील नागरीक जल्लोष व्यक्त करत असताना प्रभू श्रीरामांच्या प्रथम दर्शनाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील भावूक झाल्याचे पहावयास मिळाले.

अयोध्येतील भव्य मंदिरात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि रा. संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाना झाली. हा सोहळा संपूर्ण देशभरातील नागरीकांनी विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिला.‌ कोथरुडमधील मृत्यूंजयेश्वर मंदिरात ही या निमित्ताने विशेष नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावली.

नामदार पाटील यांनी मृत्यूंजयेश्वराचे दर्शन घेऊन प्राणप्रतिष्ठानेचा कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमातून पाहिला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी वर्ग अनिलजी व्यास(संभाजीनगर संघचालक), देवदेवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त रमेशजी भागवत, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, मंजुश्री खर्डेकर, नवनाथ जाधव,

प्रभाग क्रमांक 13 च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, अजित जगताप, प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर, बिपिनजी पाटसकर , सुनिलजी जोशी, कुणाल तोंडे,सुयश बुटाला,पार्थ मटकरी स्वप्निल राजवडे,अद्वैत जोशी, सुचित देशपांडे,देवेंद्र जाधव, अथर्व आगाशे,आसिफ तांबोळी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.